राष्ट्रवादी फोडल्यानंतर राऊत सामना कार्यालयात नाचत असतील : नितेश राणे

    03-Jul-2023
Total Views |

Nitesh-Rane
 
 
मुंबई : भाजप आ. नितेश राणे यांनी महाविकास आघाडी शरसंधान सोडले असून ते म्हणाले, संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे यांचे घर फोडल्यानंतर आता शरद पवारांचेही घर त्यांनी फोडले आहे अशी मिश्कील प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दि. २ जुलै रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून यावर बोलताना त्यांनी ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फोडल्यानंतर आता संजय राऊत सामना कार्यालयात नाचत असतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
 
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि अन्य ९ आमदार यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून फडणवीस-शिंदे सरकारसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचे आ. नितेश राणे म्हणाले. आ. नितेश राणे यांनी मालेगावात जनहिंदू आक्रोश मोर्च्यात सहभाग घेतला. नितेश राणेंच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गोरक्षकांवर होणारे हल्ले, धर्मांतर आणि हिंदू समाजावर होणारे हल्ले यांच्याविरोधात आवाज उठविण्यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. नितेश राणे म्हणाले, राज्यात गोहत्या बंदी कायदा असून त्याची योग्य अमलबजावणी संबंधित पोलीस अधिकाऱ्याकडून होत नसेल तर सरकार त्यांच्यावर कारवाई करेल, असेही ते यावेळी म्हणाले. मालेगावातील जन हिंदूआक्रोश मोर्च्यावेळी हनुमान चालीसाचे पठणही करण्यात आले. तसेच, आ. नितेश राणे यांनी आजच्या सगळ्या राजकीय घडामोडींवर एक ट्विटदेखील केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये महाविकास आघाडीचा उल्लेख करत भावपूर्ण श्रध्दांजली असे त्यात म्हटले आहे.