मुंबई : अजित पवारांनी दि. २ जुलै रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.काही दिवसापुर्वी अजित दादानी आपल्याला पक्षात संघटनात्मक जबाबदारी दिली नसल्याची खंत व्यक्त केली होती.त्यानंतर अजित पवारांनी यांनी आज दि. २ जुलै रोजी बंड केले. आणि आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षाकडे पवारांनी सुपुर्द केला आहे.
दरम्यान या बंडावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रात राष्ट्रीवादी काँग्रेसने आम्हाला साथ दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रच्या विकासासाठी नवा संकल्प अजिच पवारांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची सुद्धा प्रगती होणार असून दिल्लीचे तख्त महाराष्ट्र नक्कीच राखणार आहे. त्यामुळे शिंदेंचा 's- सुपर' ,फडणवीसांचा 'F - फास्ट', आणि आता अजित पवारांचा 'P - प्रोग्रेस' असणार आहे. त्यामुळेच अजित पवारांच्या येण्याने फडणवीस - शिंदे सरकार आणखी प्रगती करणार आहे, असे ही मुनगंटीवार म्हणाले.