अजितदादांच्या मास्टरस्ट्रोकने आदित्य ठाकरेंची उडाली झोप!

03 Jul 2023 11:41:39

Aditya-Thackeray
 
 
मुंबई : राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेना (उबाठा) आ. आदित्य ठाकरे यांची झोप उडाली असून त्यांनी राज्याच्या राजकारणावर भाष्य न करता काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. तशा पध्दतीचं ट्विट त्यांनी केले असून त्यांनी म्हटले आहे की, राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून आधीच फेल डबल झालेल्या इंजिनाला अजून एक चाक लागलं, असे ते म्हणाले.
 
दरम्यान, राज्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार फडणवीस-शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले असताना आदित्य ठाकरेंनी ज्यांना मंत्रिमंडळाची स्वप्ने पडतात त्यांना एक वर्षात काय मिळाले, असे ते म्हणाले. दरम्यान, ज्या स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0