मुंबई : अजित पवार यांनी दि. २ जुलै रोजी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर दि. ३ जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि नवे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकाच मंचावर योणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महिला बालविकास खात्याच्या 'राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण अभियानाची' सुरूवात होणार आहे. दुपारी दोन वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणाक आहे.